माझा मित्र अनिल टंक
मॅट्रिक नांतर मी सावनेर ला शिकायला गेलो . मोठं भाऊ श्रीकांत तेव्हा सावनेर तहिसल ऑफिस मध्ये नाजीर म्हणून कामाला होता . १९६६ मंधे नव्याने स्थापन झालेल्या आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज मध्ये मी बी कॉम फर्स्ट इयर ला ऍडमिशन घेतले . त्या कॉलेज चे प्राचार्य डॉक्टर र त्र गोसेवाडे श्रीकांत दादा चे परिचितांचं नव्हते तर ते आमच्या गाव पवनी चे जावई सुद्धा होते . गोसेवाडे सरांचे सासरे म्हजें आज जे पावनीला प्रसिद्ध लक्समि - रामा संस्कृतक हाल पवनी बाजार जवळ आहे त्याचे मालक . पूर्वी यांचे कलाराचे मोठे दुकान बाजार जवळच होते . दोन माळ्याची हवेली , खाली पुढे दुकान आणि वर पाढीमागे रहाणे . शेती , साधन , प्रतिष्टीत कुटुंब म्हणून ओळखले जात . जातीने कलार म्हणून कलाराचे दुकान म्हणूनच परिचय .
गोसेवाडे सरांचे पवनी येणे जाणे राहत असे . सर पूर्वी धरमपेठ कॉलेज मध्ये इकॉनॉमिक्स चे प्राध्यापक होते , पुढे डॉक्टरेट करून आता ते सावनेर च्या नवीन आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज चे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते ,गोरेपान , उंच , मजबूत बांधा , उन्नत माथा , रुबाबदार चेहरा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते तर इकॉनॉमिक्स शिकविण्यात त्यांचं हातखंडा होता .
१९६६-६९ असे तीन वर्ष मी सावनेर ला श्रीकांत दादा बरोबर राहून शिकलो . दादाचे १९६६ मध्ये लग्न झाले होते वाहिनी नागपूर , इतवारी च्या सोमकुंवर कुटुंबातील . गरीब पण सोज्वळ कुटुंब . मी बरेचदा वाहिनी बरोबर त्यांच्या माहेरला गेलो . उत्तमोतला उत्तम पाहुणचार , उठबस करीत असत . वाहिनी चा भाऊ रेल्वेत गॅंग मन , मामा सुद्धा गॅंग मन . दोघेही सज्जन आणि वाहिनीची वाहिनी तर अतिशय चांगली . वाहिनी ला एक लहान बहीण होती . महा बडबडी .
दादा वहिनींनी मला मुलं प्रमाणेच सांभाळले . त्यांना एक मुलगी झाली . रेखा तिचे नाव . अतिशय लाडात वाढली . ते दिवस फारच रम्य होते !
सावनेर चे नौकरदार , चांगले लोक जे बाहेरून आले होते ते सावजी च्या चाळीत राहायचे . हि चाल सावनेर रेल्वे स्टेशन च्या ठीक सामने होती . तीन साईड ला सहा सहा ची ३० -३५ फुटी तीन खोल्याची परसात चाल . माहित चांगला ६० -७० चौरस फुटाचा ग्राउंड एका कोपऱ्याला विहीर आणि चाळीचे संडास .दोन्ही बाजूला छोट्या गेट .चाळीतले पोर ग्राउंड मध्ये बॅडमिंटन खेडयाची . चाल मालक सावजी चा सावनेर मध्ये मोठा दरारा होता . त्याची खूप प्रॉपर्टी होती . तो मोट्या कांब मिश्या ठेवायचा आणि मिशीला पीळ देत राहत असे . आमच्या चाळीत आम्ही , तहसील आफिस चा कुलकर्णी शापायी , टेलेफोन खात्यातील धांडे , अनिल टंक चे आई वडील , बहीण भाऊ , कडू पाटील चे शिकणारे मुलं , त्यांची पत्नी कडू पाटलीन बाई , त्यांचा नौकर , रेल्वे चे बाबू मेश्राम आमच्या कॉलेज थे प्राध्यापक इसाक , तिवारी , ठाकरे राहत असत .
ते दिवस लाल गुंजी चे होते . कंट्रोल मध्ये लाल गुंजी , अमेरिकेन गहू भेटत होते , खूप दुष्काळ पडला होता . इंदिरा गांधींनी तेव्हा लाल गुंजी , अमेरिकन , गहू , मका आयात करून लोकांना खायला घातले . असे ते जिकरीचे दिवस !
अनिल टंक चे वडील लाधुभाई रेड आकसायीड चे पुरवठादार , मायनींग चा पट्टा होता . आर्थिक सुस्थिती .अनिल चे घर आमचे घर आमने सामने , तो त्याचे वडील , आई , एक मोठा भाऊ एक लहान भाऊ व सरावात लहान बहीण . ते मूळचे गुजराती , आईला बा आणि वडिलांना बापू म्हणत . बापू लाधुभाई रेड आकसायीड चे रेल्वे ला पुरवठादार , खान पट्टा असेलेले. मी सुद्धा त्यांना बापू , बा म्हणायचो . मोठा भाऊ रमेश नुकताच खापरखेड्याला बी एस्सी करून लागला होता , अनिल , लहान भाऊ विनोद , लहान बहीण वनिता आठवीत शिकणारी असे हे त्यांचे सुखी कुटुंब ! २४ तासातून १८ तास अनिल आणि मी सोबत सोबतच . तो सुद्धा माझ्याच वर्गात . कॉलेज , फिरणे , मार्केट सर्व साथ साथ .
कॉलेज ला मी फार ऍक्टिव्ह होतो , वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडून यायचा . माझे तेव्हाचे अजून काही कॉलेज मित्र होते ते म्हणजे विजय नाईक , मनोहर मोवाडे , गांधी . पण राऊत ,अनिल , विजय , मनोहर म्हणजे खास मैत्री आम्ही त्यांच्या शेतीवर जायचे , हुरडा खायचे , दोन सायकिली वर चार जण अशी आमची लांब लांब रपेट असायची . हे सर्व मित्र सधन , श्रीमंत घर ची . माझा अजून एक मित्र होता तो म्हणजे कापसे तो इसाक सरांना उलटे करून कसाई म्हणायचं . जवळ जवळ सर्व गाव मला आता कॉलेज चा होतकरू विध्यार्थी म्हणून ओळखत असे . गोसेवाडे सर म्हणायचे राऊत पोस्ट ग्रॅजुएट होऊन या याच कॉलेज ला प्राध्यापक व्हा . इकॉनॉमिक्स मध्ये मला जास्त गुणामुळे पारितोषिक मिळत असे . पुढे मी बी कॉम फायनल साठी नेवजाबाई हितकारिणी कॉलेज , ब्राह्म्हपुरी ला गेलो , एम कॉम साठी नागपूर ला जि एस कॉमर्स कॉलेज , नागपूर ला आलो , दुसऱ्या वर्षी मुंबई ला रेल्वे ऑडिट आफिस मध्ये कामाला लागलो . तेव्हा पासून जे सावनेर सुटले ते सुटले . सावनेर ला जाऊ शकलो नाही . वनिताचे नागपूरla लग्न झाले हाल वर तेव्हा पत्रिका अली होती , अनिल चे लग्न रायपूर ला झाले तेव्हा सहकुटुंब मी रायपूर ला गेलो होता . नंतर संपर्क झाला नाही . २००२ मध्ये मी त्याला पात्र लिहले त्याच्या बायकोने म्हणजे वहिनींनी लिहले ते बरेच वर्षय पूर्वी नागपूर सावनेर रोड असिसिडेन्ट मध्ये मरण पावले आणि त्यांना मुली आहेत , मोठ्या मुलीच्या लागणी नंतर पत्रिका आली . घराचा माणूस निघून गेला कि कशी वाईट अवस्था रडत रडत सांगितले तेव्हा मलाच रडू यायला लागले दोन हजार रुपये मी त्यांना दिले , अधिक असते तर अधिक दिले असते . आता मी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती .
दुःख एवढाच , मित्र अनिल , मी फार काही करू शकलो नाही !
नेटिविस्ट डी डी राऊत