ही माझी पवनी नगरी !
माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य!
पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात .
आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुलाबी, निळे , लाल कमळे बघून जीव हरखून जात असे .
माझ्या बालपणी आम्ही शुक्रवारी वार्डात राहत असू . किल्ल्याच्या अलीकडील सर्वात महत्वाची वस्ती . तिथे राहणारे सुद्धा लोक घरंदाज . घोडेस्वार , गजभिये , खापर्डे , खोब्रागडे , रामटेके , गोवर्धन , कामळे , मोटघरे , लोखंडे , नंदागवली , भाम्बोरे मधात राऊत नंतर मेश्राम , गजभिये , रामटेके अशी वस्ती म्हणजे शुक्रवारी वार्ड , लागूनच तेली मोहल्ला , एक दोन सुतारांचे घर , तीन चार माळी समाजाच्या भाजीपाला वाड्या, त्या नंतर कोष्टी मोहल्ला ,तोढे कुणबी , पारधी , चांभार , धनगर , खाटीक , लोहार अस्या वेवसायचे लोक वस्ती भाई टाकावा जवळ मुस्लिम मोहल्ला , नंतर परिटांचे एक दोन घर , काही कोमटी , दोन चार ब्राह्मण घर दीक्षित , वेव्हारे , देशपांडे . अनेक कडे शेती . तांदूळ, काठानी माल व्यापारावर शुक्रवारी तील महाराचा एकाधिकार ! महारातीलच काही बुंकर , धोतर , नऊवारी विणणारे , शेतकरी सधन. तट्टे , टोपली विणणारे पाच दहा कुटुंबाची टाळावा जवळ वस्ती त्यांचे जवळ कोळी समाजाचा बरेच घर असा हा पवनी गावचा वस्ती पसारा .
मी माझे बाल पणी एकटा तास अन तास पावनीच्या किल्ल्याच्या बुरुजाला टेकून सायंकाळचे आकाशातील बदलते रंग , बदलते ढग आकार बसून नहाळीत असे . सायंकाळी थेट बेटाला , वाही पर्यन्त फिरायला जात असे तर कधी आमराई , शेलारी नाल्या पर्यंत फिरून येई . कधी चंडकाई तर कधी घोडे घाट , पाते घाट , दिवाण घाट असे रोज चे फिरणे असे . तास दोन तास असे फिरण्यात जात आणि मग कधी बाळ समुद्रावरच्या बंधाऱ्यावर गवता वर लेटून नाही तर घाटा वरील राम मंदिराच्या विहिरीवर बसून किल्ला नाव्हळीत कसा वेळ जाई ते काळात नसे !
जसा जसा मोठा झालो तस तसा मी माझे गाव पवनी च्या अधिकाधिक प्रेमात पडलं गेलो . वनराई तील मोठा तलाव , पेरू संत्र्याचा बगीचा , लहान महादेव टेकडी असे परिसर वन भोजनाचे असायचे , शाळेच्या सहली जात . नदी ची सुंदर पांढरी वाळू , रेती , किती तरी रेतीचे महाल , किल्ले बनवून आणि नदी पात्रातील खरबूज , टरबूज चे शेत पेठे घालत पोहता येत नसले तरी उथड पाण्यात आडवे पडून घालविले तेव्हा नदी पात्र नितळ शुद्ध पाने वाहत असे खालचे दगड , मसोड्या , हाथ , स्पस्ट दिसत . असे माझे सुंदर गाव , सुंदर नगरी पवनी काही दिवसांनी माझ्याच नातेवाईकांनी म्हणजे स्वात्यंत्र सेनानी मन्साराम राऊत आणि गणपतराव खापर्डे यांनी बाल समुद्रा जवळ राम मंदिर टेकडी जवळ बुद्ध कालीन विहार शोधून काढले , सांची स्तूप पेक्षा मोठे ! आहे ना माझ्या पवनी नगरीची कमाल !
मी नौकरी निमित्य मुंबई ला आलो , कल्याण ला राहिलो पण सर्व लक्ष पवनी नागरी कडे , तिथे काय झाले ,काय चालले आहे. कधी वाटायचे नौकरी सोडून गावी जावे गाव सेवेला वाहून घ्यावे , गावाचा भाजीपाला , सुद्धा हवा , जंगल , वनराई मस्त फिरावे , ताज्या , भाजल्या मस्त मच्छी , भिरभुश्या , कारवाड्या, बारीक झिंगे , काटवे ,बोध , शिंगरा, वाघरा,तंबू , चाचे आणि चवळीची भाजी . आजून काय पाहिजे ? सोबत सिंगाडे , बोलांदे ,फातयी ,फुत्या , कचर , भिसी , चारोडी ,टेम्बार,देशी आंबे , खिरणी ओली , वळली आहेच ! ही माझी पवनी नगरी !
मंदिरांची नगरी , तलावांची नगरी , नदीची नगरी , विद्येची नगरी , स्तूपांची नगरी , विहाराची नगरी , जंगलाची नगरी , वाघाची नगरी , महादेवाची नगरी, नाग महा जनपदांची गणांची नगरी. कमळाची नगरी , पद्मावती , पदमपाणी पवनी !
आम्ही पवनी चे राऊत पूर्वी बहुदा हिंदू नाग वंशी असावे , पुढे बौद्ध झाले असावे , मध्यंतरीच्या काळात धर्मात्मा कबीर , बाबा फरीद यांचे मुराद राहिले असे दिसते . आज आमच्या घरी नाग मंदार समाधी आहे , नाग पूजा आहे , कबीर , बाबा फरीद सेवा आहे . आम्ही हिंदू आहोत . आमच्या घर जवळ खोदकाम केले तर ताम्र पत्रे , जमा मिळते , पैसे, मणी मिळतात . राऊत म्हणजे राज सैन्य . नाग मंदार या गण राज्याच्या , महा गण पदाचे आम्ही एक प्रमुख गण असावेत म्हणून आम्ही सर्व राऊत नाग मंदाराची पूजा करतो , नाग ठाणे घरी आहे ,लोक लहान मुलांसाठी राखोंडी घेऊन जात असत . आमची कुल देवता नाग मंदार आहे. आमचा पूर्वज नाग मंदार आहे .कबीरांना मानतो , बाबा फरीद मानतो !
आम्ही राज कुळातील असोन किव्हा नासोन पण आम्ही नाग वंशी आहोत , नाग परंपरा जपतो , नाग पंचमी , नाग मंदार पूजा हि आमची परंपरा आहे ! पवनी हि मात्र नाग वंशी गण राज्याची राजधानी , विद्येचे माहेरघर आणि सुखी लोकांची नगरी होती हे मात्र खरे !
नेटिविस्ट डी डी राऊत